रावेर शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
रावेर शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर शहरात नगर पालिका हद्दीत लावण्यात आलेले अनअधिकृत बॅनेरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे करण्यात आले आहे.पालिकेने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले आहे
रावेर शहरात बऱ्याच लोकांचे वाढ दिवसाचे बॅनर हे नगर पालिकेची परवानगी न घेता लावण्यात येतात. तसेच वरील बॅनर हे बरेच दिवस काढले जात नाही. वाढदिवसाच्या बॅनरची परवानगी घेतल्या शिवाय वाढ दिवसाचे बॅनर लावू देऊ नये व परवानगी मध्ये बॅनर काढण्याची मुदत सुध्दा टाकावी व मुदतीचे आत बॅनर न काढल्यास त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.वाढदिवसाचे बॅनर लावणे कामी परवानगी न घेता बॅनर लावल्यास त्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व त्याचे होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शहर तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांना देण्यात आले आहे