शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजना लाभ घेऊन प्रगती करावी अधीक्षक अधिकारी आर.बी.चलवदे यांचे आवाहन

Nov 8, 2023 - 00:09
 0

रावेर येथे मंगलम लोन मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग रावेर तालुका ड्रीप डीलर असोसिएशन ठिबक उत्पादक कंपनी कृषी तंत्र व अवजारे ट्रॅक्टर उत्पादक व विक्रेते बँकर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला जिल्हा कृषी अधिकारी आर बी चलवदे यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्याने राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन शेती अवजारे व शेती उपयुक्त साधने घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले
शेतकरी मेळाव्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्स रावेर श्रीराम ठिबक सिंचन शिका मोटर्स नेटाफिम ठिबक यासह बऱ्याच उत्पादक कंपन्यांनी आपले स्टॉल लावून शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी या स्टॉलला कृषी अधिकारी सह मान्यवरांनी ही भेट दिली 

यावेळी केळी पिक विमा, ठिबक सिंचन अनुदान यासह इतर विषयांवरही शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करत आपले म्हणणे मांडले
यावेळी महा बनाना चे भागवत पाटील हरीश शेठ गनवाणी राष्ट्रवादी किसान जळगाव जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील जळगाव ड्रीप डीलर असोसिएशन अध्यक्ष सोपान साहेबराव पाटीलकृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील उपसभापती योगेश पाटील युवा नेते धनंजय भाऊ चौधरी रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्या सह शेतकरी कृषी विभागातील कर्मचारी  उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील