ब्रेकिंग : रसलपुरच्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नातेवाईकांचा आरोप

ब्रेकिंग : रसलपुरच्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नातेवाईकांचा आरोप

Nov 22, 2023 - 15:56
 0
ब्रेकिंग : रसलपुरच्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नातेवाईकांचा आरोप

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क / रावेर

 रावेर तालुक्यातील रसलपुर येथील एका गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या दोन तासात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

 हनीफा संजय तडवी वय ३८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान बुधवारी सकाळी मयत महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जळगाव येथे पाठविण्याचा निर्णय येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर मयताचे नातेवाईक व वैद्यकिय अधिकाऱ्यांमध्ये यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे रुग्णालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र वरिष्ठांशी बोलणी झाल्यावर येथेच शवविच्छेदन करण्यात येईल असे सांगितल्यावर नातेवाईक शांत झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

रसलपुर येथील गर्भवती हनिफा तडवी ही मंगळवारी रात्री दहा वाजता घरी नॉर्मल प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर त्रास होऊ लागल्याने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासणी केल्यावर मयत घोषित केले. व सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल असे सांगितले. मात्र सकाळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृतदेह शव विच्छेदनसाठी जळगाव येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. याला मयत महिलेच्या नातेवाईकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे वैद्यकिय अधिकारी व नातेवाईक यांच्यामधे शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलीस उप निरीक्षक सचिन नवले उप निरीक्षक दिपाली पाटील व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मयताच्या नातेवाईकांची समजूत काढली. तर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यावर शव विच्छेदन रावेर येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर नातेवाईकांचा रोष शांत झाला. रावेर येथेच शवविच्छेदन करण्यात आले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील