मुंजलवाडी शिवारात बिबट्याने केले वासराला ठार, शेतकऱ्यांच्या नुकसान

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात बिबट्याने केले वासराला ठार केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Mar 21, 2025 - 10:48
 0
मुंजलवाडी शिवारात बिबट्याने केले वासराला ठार, शेतकऱ्यांच्या नुकसान

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर I

 रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात बिबट्याने केले वासराला ठार केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे 

रावेर तालुक्यात असलेल्या शेती क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल मुंजलवाडी  शिवारात बिबट्याने वासराचा ठार केले असून यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तर  वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावे यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारी भीती दूर होईल अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे 

 विवरा व वडगाव दरम्यान बिबट्याचे दर्शन 

विवरा व वडगाव दरम्यान निंभोरा फाटा च्या समोर (पश्चिम )दिशेला जाणार शेत रस्त्याने आज बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती वडगाव च्या शेत मजुराने दिली असून तरी सत्य ते बाहेर येईलच तो पर्यन्त सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.तसेच शेतात राहणाऱ्या मजूर कुटूंबाना वन विभागाने वेळोवेळी माहिती माहिती द्यावी

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील