रावेर येथील 62 वर्षीय रतन भालेराव यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त

रावेर येथील 62 वर्षीय रतन भालेराव यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त

Dec 2, 2023 - 22:47
 0
रावेर येथील 62 वर्षीय रतन भालेराव यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त

प्रतिनिधी / रावेर

रावेर येथील तहसील कार्यालयातील सेवा निवृत्त शिपाई रतन राजाराम भालेराव राहनार नवीन सावदा रोड जी एस आय कॉलनी रावेर (वय ६२) यांचा येथील रेल्वे स्टेशनजवळ रावेरकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेची बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

रतन भालेराव यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या रतन भालेराव यांनी तहसील कार्यालयात काम करताना सर्वांशी प्रेमाचे संबंध निर्माण केले होते. अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील