रावेर येथील चंद्रकांत महाजन याचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश, सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
रावेर येथील चंद्रकांत महाजन याचे MHT-CET परीक्षेत घवघवीत यश, सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील युवक चंद्रकांत ज्ञानेश्वर महाजन याने MHT-CET या परीक्षेमध्ये 99.06 पर्सेंटाइल मिळवीत घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच्या या यशा बद्दल परिवारा तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला.
रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील रहिवासी असलेला चंद्रकांत ज्ञानेश्वर महाजन याने MHT-CET ची तयारी घरीच ऑनलाईन क्लासेस लावून केली होती. मे महिन्यात MHT-CET ची महाराष्ट्र शासनाने परीक्षा घेतली. या परीक्षाचा निकाल काल घोषित करण्यात आला यामध्ये चंद्रकांत महाजन याने 99.06 पर्सेंटाइल मिळून यश घवघवीत यश संपादन केले याबद्दल त्याचा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी नाना महाजन,बबलूशेट नगरीया,संजय पाटील,भागवत चौधरी, डी डी वाणी, देवलाल पाटील, जयंत भागवत,प्रदीप वैद्य, सुनिल चौधरी, पिंटू महाजन,शालिक महाजन,प्रकाश पवार, सुरेश पाटील,दत्तु महाजन,संतोष श्रीखंडे,गोपाल महाजन,आदींनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.