रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी, चोपडा येथे दादाजी धुनिवाले दरबारात प्रचारा निमित्त नागरिकांना श्रीराम पाटीलांचे आश्वासन
रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी, चोपडा येथे दादाजी धुनिवाले दरबारात प्रचारा निमित्त नागरिकांना श्रीराम पाटीलांचे आश्वासन
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / चोपडा
रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकास झाला नाही असे या मतदार संघातील नागरिक आपल्याला भेटी दरम्यान सांगत आहेत. अनेक समस्यांचा पाढा ते वाचत आहेत. निवडणुकीत मी दुसऱ्याच्या गॅरंटीवर मत मागणार नाही. मात्र या समस्या व प्रश्न भावी काळात सोडविणार हि आपली गॅरंटी आहे असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी चोपडा तालुक्यात प्रचार भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दिले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी निमगव्हाण (ता चोपडा )येथील प्रकाशगड श्री धुनीवाले दादाजी यांच्या दरबार दर्शनाने चोपडा तालुक्यात प्रचार दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील , राजेंद्र पाटील, माजी सभापती डी पी साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ललित बागुल, तुकाराम पाटील, नंदू आबा पाटील, दीपक आधार, देविदास कोळी, सुनील पाटील, राजेंद्र भाटिया, जगत पाटील, गोपाल धनगर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चोपडा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरा, कोळंबा, वडगाव सिम येथे ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न व समस्या एकूण घेत त्या सोडविण्याचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी खाचणे येथील माजी सरपंच धनराज पाटील , भगवान पाटील संजय पाटील सुनील पाटील वासुदेव पाटील सरपंच सौ .रामाबाई पांडुरंग पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, ग्रामसदस्य अरुण पाटील, डी एम साहेब तर कुरवेल येथे माजी जि.प अध्यक्ष गोरख तात्यासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुरवेल ग्रामस्थ उपस्थित होते. सनफुले येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला यावेळी वासुदेव पाटील, सरपंच पुंजू कोळी, विक्रम पाटील, हिरामण पाटील, रामकृष्ण पाटील, दिगंबर पाटील, विनोद पाटील, यशवंत पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. काठोरा येथील सरपंच एकनाथ कोळी, माजी चेअरमन शिवाजी पाटील, डॉ. विलास पवार, माजी चेअरमन आनंदराव पाटील , माजी सरपंच अधिकार पाटील, सुनील पाटील यांच्याशी चर्चा केली. कोळंबा व वडगांव सिम येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत संवाद साधला.