चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध
चार कामे सांगा म्हणत रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा रविवारी रावेर तालुक्यात प्रचार दौरा होता.पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह खासदार खडसे कोचूर येथे आल्या असता येथील काही ग्रामस्थांनी त्यांना चार विकास कामे सांगा म्हणत विरोध केला. त्यामुळे त्यांना आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ अली.
भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तिसऱ्यांदा त्यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. रविवारी रावेर तालुक्यात त्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी आल्या होत्या. कोचुर खुर्द येथे आल्या असता काही ग्रामस्थांनी त्यांना दहा वर्षात केलीली चार कामे सांगा म्हणत रोष व्यक्त केला. त्यामुळे खासदार खडसे निरुत्तर झाल्या. व आल्या पावली माघारी फिरण्याची त्यांच्यावर वेळ अली. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत त्यांना थांबवले. याबाबतचा व्हिडीओ रविवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. खासदार रक्षा खडसे यांनाक्ष नागरिकांकडून होणारा विरोध पाहता त्यांच्यबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी दिसून येते.