रावेर तालुक्यातील कृषी उत्पन्न संचालक व आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचाही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

रावेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचाही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेशकेल्याने भाजपाला रावेर तालुक्यात आणखी बळ मिळेल

Oct 2, 2025 - 16:29
Oct 2, 2025 - 19:15
 0
रावेर तालुक्यातील कृषी उत्पन्न संचालक व आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचाही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश
रावेर तालुक्यातील कृषी उत्पन्न संचालक व आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचाही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी व जयेश कुयटे यांच्यासह बहुसंख्या कार्यकर्त्यांनी जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीतीत प्रवेश घेतला. यावेळी आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील. यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील भाजपला आणखी बळ मिळणार असले तरी जुन्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढणार असल्याचे बोलले जात आहे

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी व जयेश कुयटे हे सभापती व उप सभापतीवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यावेळी भाजपच्या बाजूने उभे राहून या भाजपाच्या गोटात सामील झाले होते.  या तिन्ही संचालकांनी भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गळ्यात रुमाल घालून अधिकृतपणे प्रवेश घेतला आहे. यावेळीसौ. रेखा किशोर महाजन, सदस्या, ग्रामपंचायत,अटवाडे,योगेश सतिष महाजन, सदस्य, ग्रामपंचायत, अटवाडे,नितिन आत्माराम धनगर, सदस्य, ग्रामपंचायत, अटवाडे, भगवान बारसू धनगर, सदस्य, ग्रामपंचायत, अटवाडे, कैलास आनंदा महाजन, संचालक, वि.का. सो, अटवाडे,किरण सोपान कोळी, संचालक, वि.का. सो, अटवाडे,रुपेश राजेंद्र महाजन, संचालक, वि.का. सो, अटवाडे,प्रविण रमेश सावकारे, संचालक, वि. का. सो, अटवाडे,बाजीराव वामन ठाकरे, माजी उपसरपंच, ग्रा. पं. कोळोदे, सौ. शारदा बाजीराव ठाकरे, माजी सरपंच, ग्रा. पं. कोळोदे, विशाल मनोहर तायडे, सदस्य, ग्रा. पं. निंभोरा बु।।, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

पुढे होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याची चर्चा तालुक्यात सुरु असून यापैकी अनेक जण निवडणुकीसाठी इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. यामुळे भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत असून निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी ही संख्या वाढत असल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व नवीन कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील