रब्बी व खरीप हंगामात पॅसिफिका 72 74 मक्याच्या वानाने शेतकऱ्यांना लाभणार समृद्धी डॉक्टर श्याम हैबतपुरे यांचे प्रतिपादन

रब्बी व खरीप हंगामात पॅसिफिका 72 74 मक्याच्या वानाने शेतकऱ्यांना लाभणार समृद्धी डॉक्टर श्याम हैबतपुरे यांचे प्रतिपादन

Oct 9, 2023 - 00:21
 0

मुक्ताई वार्ता रावेर

न्यूज नेटवर्क करावे

रावेर तालुक्यातील कोचुर येथे अतुल कौतिक महाजन यांच्या शेतात पॅसिफिक क्रॉप बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड हिम्मतनगर गुजरात यांच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला गणपती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

 यात पॅसिफिक 72 74 मक्याच्या वानाने शेतकऱ्यांना समृद्धी लाभेल त्या हेतूने हे वाण बनवले असून हे वाण रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात उत्तमरीत्या चांगलं उत्पन्न देते असे यावेळी पीक पाहणी दौऱ्यात सांगण्यात आले यावेळी कोचुर येथील शेतकरी अतुल महाजन यांच्या शेतातील त्यांनी लावलेल्या पॅसिफिका 72 74 मक्याच्या पिकाची पाहणी करण्यात आली. उत्तम कणस वजन रंग यामुळे शेतकऱ्यांना एकरी चांगले मोठे उत्पन्न होईल त्यामुळे आमच्या या पॅसिफिक 72 74 मक्याच्या वानाचा शेतकऱ्यांनी पेरणी करून उत्पन्नात समृद्धी आणावी असे यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर परेश पटेल यांनी सांगितले 

रावेर यावल मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील कृषी केंद्र संचालक यांना बोलावून त्यांच्या माध्यमातून या वाणाचे विक्री व्हावी यासाठी व शेतकऱ्यांना या वाणाच्या उत्पन्नाचा फायदा होऊन आर्थिक सुबकता लाभावी यासाठी पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 या कार्यक्रमासाठी पॅसिफिक क्रॉप बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर परेश पटेल, टेक्निशियन डॉक्टर श्याम हैबतपुरे, अतुल महाजन ,अनिल खंडेलवाल, एरिया मॅनेजर अशोक नेमाने रावेर चे डीलर युवराज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने कृषी केंद्र संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रितेश महाजन यांनी केले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील