पोळा सणामुळे रावेरचा शुक्रवारचा आठवडे बाजार 21 ऑगस्ट गुरुवारी भरणार, जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर बैल पोळा या सणामुळे रावेरचा शुक्रवारचा आठवडे बाजार 21 ऑगस्ट गुरुवारी भरणार असल्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे

Aug 20, 2025 - 09:14
 0
पोळा सणामुळे रावेरचा शुक्रवारचा  आठवडे बाजार 21 ऑगस्ट गुरुवारी भरणार, जिल्हाधिकारी जळगाव यांचे  आदेश

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर ।

रावेर शहराचा बाजाराचा दिवस हा शुक्रवार असून या शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी येणाऱ्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार हा गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी भरण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. सणाच्या दिवशी होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

रावेर शहराचा नियमित आठवडे बाजार दर शुक्रवारी भरतो. परंतु, यावर्षी शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी पोळा सण येत असल्याने त्याच दिवशी बाजारासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही बैलपोळा सणाचे कार्यक्रम आणि बाजारातील गर्दी यामुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता होती, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून, नागरिकांची सुरक्षितता आणि सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 'मुंबई मार्केट फेअर्स अॅक्ट १८६२' च्या कलमानुसार, रावेर शहराचा आठवडे बाजार एक दिवस आधी, म्हणजेच गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी भरवण्याचे आदेश जारी केले आहेत. व्यापाऱ्यांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील