केळी उत्पादन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार जिल्हाधिकारी यांची घेतली भेट

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l केळी उत्पादन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली

Aug 20, 2025 - 20:49
 0
केळी उत्पादन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार जिल्हाधिकारी यांची घेतली भेट

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

पंधरा दिवसापूर्वी केळीचे भाव हे योग्य होते परंतु गेल्या काही दिवसांपासून केळीचे भाव पाडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. घाम गाळून तयार केलेल्या उत्पादनाला समाधानकारक दर मिळावा हीच प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. परंतु भावकपात होऊन शेतकरी हताश होण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या केळीला सन्मानजनक व समाधानकारक भाव मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या भेटीतील चर्चेत केवळ तात्पुरत्या भाववाढीपुरतेच नव्हे तर केळी क्लस्टर, प्रिकूलिंग व कोल्ड स्टोरेज उभारणीसंदर्भात प्रशासन व बाजार समिती कोणती ठोस पावले उचलू शकते, ज्यातून दीर्घकालीन शेतकरी हित साधले जाईल, यावरही विशेष भर देण्यात आला.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी महोदयांनी येत्या दोन दिवसांत बुऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पुढील आठ ते दहा दिवसांत योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित व सन्मानजनक भाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस मा. जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, संचालक योगीराज पाटील, डॉ. राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होत

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील