दानापुर पुणे एक्सप्रेस रावेरला उद्यापासून थांबणार,केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून होणार उद्घाटन
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर दानापुर पुणे एक्सप्रेस रावेरला उद्यापासून संध्याकाळी पाच वाजता थांबणार असून,केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन होणार आहे

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर हून पुण्यासाठी जाण्यासाठी व येण्यासाठी खूप महत्त्वाचे असलेली दानापूर पुणे एक्सप्रेस ला रावेर ला थांबा मिळाला असून यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी सोय होणार आहे यासाठी प्रवासी संघटनांनी वेळोवेळी निवेदन देऊन व केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांनी थांबा मिळण्यासाठी प्रयत्न केले होते त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांनी दानापूर पुणे एक्सप्रेसला रावेर थांब मिळाला असून उद्या दिनांक *23/8/2025* शनिवार वेळ सं. *5:00* ला *श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी मिळणार असून सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उद्या रावेर रेल्वे स्टेशन येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे