गावठी कट्टा सह एकाला अटक, रावेर पोलिसांची कामगिरी
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात गावठी कट्टा घेऊन येणाऱ्या वडोदा तालुका यावल येथील तरुणांस रावेर पोलिसाच्या वस्ती पथकाने अटक केली
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात गावठी कट्टा घेऊन येणाऱ्या वडोदा तालुका यावल येथील तरुणांस रावेर पोलिसाच्या वस्ती पथकाने अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातून एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन पाल मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी उप निरीक्षक तुषार पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांना पाल जवळील शेरी नाका येथे नाकाबंदी सुरु असलेल्या ठिकाणी पाठवले. शुक्रवारी सकाळी चार वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता दहा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. ते पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून संशयित आरोपी भरत गणेश सोनवणे वय 32 रा वढोदा ता. यावल जि. जळगाव याला अटक करण्यात आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . तर पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.