शेख मेहमूद यांचा रावेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाचा राजीनामा
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- शेख मेहमूद यांनी रावेर शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील शेख मेहमूद शेख हसन मण्यार यांनी आपल्या रावेर शहराध्यक्ष व पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू यांच्याकडे सुपूर्द केला
शेख मेहमूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला रामराम ठोकला आहे पक्षात मानाचे स्थान मिळत नसल्यामुळे व वेळोवेळी पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघड्या यामुळे पदाचा राजीनामा देत आहे
नेहमीच अल्पसंख्यांक समाजाला डावळले जात असल्याचे त्यांचे म्हणणे असून समाजाला योग्य न्याय देता येत नसल्यामुळे मी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य पदाचा व रावेर शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले