महाराष्ट्र राज्य शासनाचा "सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार" शिक्षक दिलीप पाटील यांना मुंबई येथे प्रदान
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील आभोडा बु ता-रावेर जिल्हा परिषद शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक दिलीप पाटील यांना सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,शालेय शिक्षणमंत्री मा.दिपक केसरकर साहेब,यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील आभोडा बु येथील प्राथमिक शाळेचे शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक दिलीप पाटील यांना सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,शालेय शिक्षणमंत्री मा.दिपक केसरकर साहेब,यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष मा.ॲड.श्री राहूल नार्वेकर साहेब,कौशल्य विकास व उद्योजगता विभाग मंत्री मा.श्री मंगलप्रभात लोढा साहेब, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मा.आय.ए.कुंदन मॅडम,शिक्षण आयुक्त मा.श्री सुरज मांढरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.आजपर्यंत समर्पण भावनेने केलेल्या सेवेचे हे फळच म्हणावे लागेल.कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपण आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत राहावे.आपल्याला त्याचे चांगले फळ आपल्या जीवनात मिळतेच.असे भावनोद्गार सरांनी काढले.
याप्रसंगी उपस्थित जिल्हा भरातील सर्व मित्र परिवाराकडून दिलीप पाटील सरांना शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.