रावेर तालुक्यात वादळाचा तडाखा, वादळाने घातले थैमान
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यात वादळाचा तडाखा, वादळाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले केळी भागांचे नुकसान झाल्याचे चित्र सध्या दिसून आले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर तालुक्यात मोरगाव, खीरवड, पुनखेडा, पातोंडी या तालुक्यात जोरदार वादळी वऱ्यांसाह जोरदार पावसाची हजेरी झाल्याने केळी सह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले.
रावेर तालुक्यात मंगळवार रोजी आलेल्या वादळाने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये लावलेल्या मक्याच्या, कडब्याचया गुळांना आग लागल्यामुळे खीरवड मोरगाव दरम्यान रस्त्यावर आग पसरली होती तसेच विजेचे तारही या रस्त्यावर तुटल्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता परंतु काही शेतकऱ्यांनी मदत करीत रस्त्यावरील लागलेला आगीला विझवण्याचा प्रयत्न केला तर विजेचे तारही शेतकऱ्यांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली वादळामुळे केळीचे फार मोठे नुकसान झाल्याचे सध्या बोलले जात असून किती नुकसान झाले हे पंचनामे नंतरच लक्षात येईल अचानक आलेला वादळी वारा व पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली