आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर आगारात ५ नवीन एसटी बस दाखल
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर बस आगारात ५ नवीन एसटी बस दाखल झाल्याने प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर एस.टी. आगारात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे राज्य परिवहन मंडळाकडून ५ नवीन एसटी बस प्राप्त झाल्या असून, या उपक्रमामुळे प्रवासी नागरिकांत आनंदाची लाट उसळली आहे. दीर्घ काळापासून या बसची प्रतीक्षा होती, ती अखेर पूर्ण झाली आहे.
या नवीन बसांचा लोकार्पण सोहळा नारळ फोडून व विधिवत पूजन करून बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे मान्यवर उपस्थित होते.
रावेर आगारात एकूण ५५ बस कार्यरत आहेत. यातील ५ बस लवकरच स्क्रॅपमध्ये जाणार असल्याने बसफेऱ्या नियमितपणे चालवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, नव्याने मिळालेल्या बसमुळे ही अडचण दूर होणार आहे, व प्रवाशांची सेवा अधिक सुलभ होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यात भाजपा प्रदेश सदस्य सुरेशभाऊ धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, प्रल्हादभाऊ पाटील, आगारप्रमुख इम्रान पठाण, तहसीलदार बंडू कापसे, पी.आय डॉ. विशाल जयस्वाल,माऊली फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, जिल्हा चिटणीस राजनभाऊ लासुरकर, माजी गटनेते पं. स. पि. के. महाजन, तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष चेतन पाटील, सहकार आघाडी उपाध्यक्ष नितीन पाटील, महिला आघाडी अध्यक्षा आशाताई सपकाळे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस वासुभाऊ नरवाडे, उमेश महाजन, मनोजभाऊ श्रावक, निलेश सावळे, अमोल पाटील, रविंद्र महाजन, भूषणभाऊ महाजन, बाळा आमोदकर, योगेश महाजन, पंकज चौधरी, चंद्रकांत वैद्यकर, राजेश भाऊ शिंदे, अनंत महाजन, अजिंक्य वाणी, लखन महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर बस आगाराला नवीन बस मिळाल्या मुळे रावेर तालीक्यातील प्रवाशांना अधिक चांगली, नियमित व सोयीची बससेवा मिळण्यास मदत होणार असून, आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांकडून मनःपूर्वक स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.