अंकलेश्वर-बर्हाणपुर महामार्ग रावेरातुन न्या अन्यथा आंदोलन करु
अंकलेश्वर-बर्हाणपुर महामार्ग रावेरातुन न्या अन्यथा आंदोलन करु
रावेर :- अंकलेश्वर-बर्हाणपुर महामार्ग चौपदरीकरणातून रावेर व सावदा या शहरांना वगळलेले दिसून येण्याबाबतचे उपजिल्हाधिकार्यांना श्रीराम फाऊंडेशन तर्फे निवेदन श्रीरामदादा पाटील व रावेरकर यांच्या हस्ते देण्यात आले असुन त्या आशयाची प्रत भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार यांना देण्यात आली.
रावेर शहर हे वर्षानुवर्षांपासुन रावेर लोकसभा मतदार संघ व तसेच रावेर विधानसभा मतदार संघ या नावाने ओळखले जाते असून सुद्धा जमीन भूसंपादनासाठी रावेर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीण क्षेत्रामार्गे चौपदरीकरण महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे. पुर्वीपासून अंकलेश्वर-बर्हाणपुर राज्यमार्ग क्रमांक-4 असे वापरात आहे, आणि ते फैजपुर-सावदा-रावेर ते चोरवड महाराष्ट्र राज्याची सीमा असे बुरहानपुर यामार्गे जात आहे. त्यावर परिवहन नाके आज पर्यन्त अमंलात आहे. रावेर-सावदा-फैजपुर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव, केळी उत्पादक व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध आहे. असे असून सुद्धा या दोन्ही शहर वासीयांना दळणवळण व व्यवसायापासून वंचित व दूर करण्यात येत आहे असा अन्याय होऊ नये म्हणून ठिया आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. केळी माल निर्यात करण्यासाठी रावेर सावदा-फैजपुर येथे ट्रक लोडींग, ट्रान्सपोर्टिंग केळी निर्यात करण्याचे कार्य अविरत सुरु राहणार आहे, असे असताना सुद्धा रावेर लोकसभा-विधानसभा मतदार संघावर चौपदरीकरण रस्त्याचे भूसंपादन वेगळ्या दिशेने होत असून आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या सहनशिलतेच्या हा अंत आहे. चौपदीरकरण रस्ता हा रावेर व सावदा-फैजपुर या शहरातून किंवा शहराला लागून झाला पाहिजे. अशी आमची मागणी निवेदना द्वारे मा.प्रकल्प अधिकारी भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण यांना केली आहे. व ती मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदरील निवेदन देतेवेळी श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम दयाराम पाटील, मराठा सेवा संघाचे राम दादा पवार, प्राध्यापक गोपाल दर्जीसर, माजी उपनगराध्यक्ष अ. मुत्तलीफ अ. रफिक, सीताराम महाजन, सीताराम पाटील, स्वप्नील पाटील, भाऊराव पाटील, बाळू पाटील, सुनिल महाजन, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, गोविंद पाटील, घनश्याम पाटील, प्रवीण महाजन, रामचंद्र पाटील, सुरज कोलते, रवींद्र महाले, श्रीकांत बोरसे, विलास महाजन व रावेरकर असंख्य संख्येने उपस्थित होते.