UPSC परीक्षेत मुक्ताईनगरच्या मोहिनी जगताप यांचे घवघवीत यश
मुक्ताईनगर नेटवर्क रावेर:- मुक्ताईनगरची सुपुत्री कुमारी मोहिनी अशोक जगताप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ३२३वी रँक मिळवून यश संपादन केले.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
मुक्ताईनगरची सुपुत्री कुमारी मोहिनी अशोक जगताप यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ३२३वी रँक मिळवून यश संपादन केले. त्याबद्दल आपले व पालकांचे मनापासून अभिनंदन !
जिद्द व चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करता येते. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेवून कु. मोहिनी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीला मूर्त स्वरुप मिळवून दिले हे विशेष उल्लेखनीय आहे. तिचे यश हे निश्चितच इतर विद्यार्थी विद्यार्थिनी साठी प्रेरणादायी आहे अशाच कर्तुत्वान मोहिनी जगताप यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
शिक्षकाची मुलगी, तिच्या शिक्षणासाठी तिच्या आईने घेतलेले खडतर परिश्रम हे आदर्श पालकांचे आगळेवेगळे उदाहरण आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून आयएएस उत्तीर्ण होण्याचा पहिला मान कु.मोहिनी जगताप यांनी पटकाविला. याबद्दल मुक्ताई वार्ता परिवारातर्फे पुनश्च एकदा अभिनंदन तर भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा !