Big Breking : २१ डिसेंबर ला होणाऱ्या नगरपालिका निकालावर सुप्रिम कोर्टात आज तातडीची सुनावणी शक्यता

Big Breking : २१ डिसेंबर ला होणाऱ्या नगरपालिका निकालावर सुप्रिम कोर्टात आज तातडीची सुनावणी आज होणार त्यामुळे निकाल लवकर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही

Dec 5, 2025 - 08:39
 0
Big Breking : २१ डिसेंबर ला होणाऱ्या नगरपालिका निकालावर सुप्रिम कोर्टात आज तातडीची सुनावणी शक्यता

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

 राज्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच मतमोजणीच्या तारखेवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील मतदान झालेल्या सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या आदेशाला आव्हान देणारी याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आज, ५ डिसेंबरला, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २ डिसेंबरला मतदान झालेल्या २६४ नगरपालिका/नगरपंचायतींची ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती. २० डिसेंबरला मतदान होणाऱ्या निवडणुकांच्या निकालावर प्रभाव पडू नये, यासाठी सर्व निकाल एकाच दिवशी (२१ डिसेंबर) जाहीर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

या निर्णयाविरुद्ध राजकिरण बर्वे आणि 'एआयएमआयएम'चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी केली आहे, ही माहिती याचिकाकर्ते मो. युसूफ पुंजानी यांच्यावतीने अॅड. फिरोज शेकूवाले यांनी दिल्याचे वृत्त आहे. या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिके संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून, स्थानिक निवडणुकीच्या निकालाचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून असेल.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील