ॲड.प्रा.मनिषा संदीप देशमुख लिखित " युथ अँड जस्टीस" पुस्तकाचे खेळ व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रकाशन
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l प्रा.मनिषा संदीप देशमुख लिखित " युथ अँड जस्टीस" पुस्तकाचे खेळ व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रकाशन.

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड गावच्या सरपंच तथा संत गाडगे महाराज जुनिअर कॉलेजच्या प्रा. ऍड मनिषा संदीप देशमुख यांनी इंग्रजी भाषेतून लिहिलेले "युथ अँड जस्टीस" (अंडरस्टँडिंग जुवेनाईल ओफेंडर्स इन इंडिया) या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय खेळ व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी संदीप दिनकरराव देशमुख, युवा अयकॉन व लेखक केतन फिरके , उद्योजक धनंजय एदलाबादकर ,पत्रकार मतीन शेख, विनायक वाडेकर, अभयसिंग देशमुख, समीक्षा देशमुख, यशवीर देशमुख उपस्थित होते.
सदर पुस्तकात बाल गुन्हेगारी त्यासाठी असलेला न्याय, तसेच बालकांचे पुनर्वसन यासह बालकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक दायित्व, कायदेशीर व नैतिक विचारसरणी यासह सामाजिक जबाबदारी यासारख्या विषयांचा अंतर्भाव सदर करण्यात आलेला आहे.
याप्रसंगी केंद्रीय व राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या पुस्तकाला शुभेच्छा पर संदेश दिलेला आहे. त्यासोबतच माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे,महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष एडवोकेट रोहिणी खडसे, आयपीएस कुलदीप सोनवणे, श्रीमती एम.डी शर्मा, माजी प्राचार्य डॉ. सोपान बोराटे, डॉ. प्रमोद महाजन, प्राचार्य डॉ. नयना झोपे यासारख्या मान्यवरांनी शुभेच्छा पर संदेश पुस्तकात लिखित स्वरूपात दिलेले आहे.
याप्रसंगी पुस्तकाचे अवलोकन केल्यावर भारतातील अल्पवयीन गुन्हेगारांना समजुन घेतांना, त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक पुनर्वसन कशे करता येईल, बालकांचे संरक्षण त्या संदर्भात असलेले कायदे व समाज प्रबोधन या दृष्टिकोनातून हे पुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.