सुप्त क्षयराेगावर वेळेत उपचार झाल्यास ताे बरा हाेताे - डाॅ. सुनील चाैधरी आय एम ए संघटनेची रावेर यावलं तालुका कार्यशाळा संपन्न

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l सुप्त क्षयराेगावर वेळेत उपचार झाल्यास ताे बरा हाेताे असे प्रतिपादन डॉक्टर सुनील चौधरी यांनी केले.आय एम ए संघटनेची रावेर यावलं तालुका कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Jul 7, 2025 - 08:44
Jul 7, 2025 - 08:46
 0
सुप्त क्षयराेगावर वेळेत उपचार झाल्यास ताे बरा हाेताे - डाॅ. सुनील चाैधरी  आय एम ए संघटनेची रावेर यावलं तालुका कार्यशाळा संपन्न

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रभाकर बुला हाॅल मध्ये आयएमए ताप्ती व्हली रावेर, सावदा, फैजपूर व यावल तर्फे कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डाॅ. सुनिता वारके होत्या

या वेळीप्रमुख वक्ते हृदयरोग तज्ञ डाॅ. सुनील चाैधरी यांनी क्षय रोग विषयावर मार्गदर्शनात सांगितले की, सुप्त क्षयराेग (लेटेन्ट टुबर्गकाेलासीस) लवकर ओळखला गेला आणि त्यावर वेळेत उपचार झाले तर ताे बरा होतो असे सांगून अनेक बाबीवर प्रकाशझोत टाकला . . 

 कार्यशाळेत जळगाव येथील बालराेग तज्ज्ञ डाॅ. अविनाश भाेसले यांनी हाॅटीझम या विषयावर मार्गदर्शन केले. आयएमए चे अध्यक्ष डाॅ. संदीप पाटील यांनी सांगितले की, जनतेच्या सेवेसाठी अशा कार्यशाळांचे आयाेजन महत्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आमंत्रित करून असे कार्यक्रम माेठ्या संख्येने घेणे गरजेचे आहे. यामुळे माहिती व ज्ञानात भर पडते. या कार्यक्रमाला सर्व आयएमए सदस्यांनी सहकार्य केल्याचेही ते म्हणाले. डाॅ. नुपूर वारके यांनी  त्वचा राेग या शिक्षणात उच्चश्रेणीत तसेच चिन्मय महाजन यांनी जेईई मध्ये उच्च श्रेणीत व डाॅ. वृषाली सराेदे यांना डी.एम. काॅर्डीओलाॅजीला प्रवेश तसेच डॉ स्वराज पाटील यांना एम डी मेडिसिन ला प्रवेश मिळाल्याने त्यांच्या आई - वडीलांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन डाॅ. सुचीता कुयटे व डाॅ. उमेश पिंगळे यांंनी केले. तर आभार विशाल जाधव  यांनी मानले.

यावेळी डॉ योगिता पाटील, डॉ मीनल दलाल, डॉ अतुल सरोदे, डॉ योगेश महाजन डॉ सुरेश महाजन, डॉ प्रवीण चौधरी, डॉ मिलिंद वानखेडे, डॉ खाचणे, डॉ श्री खासणे डॉ व्ही जी वारके डॉ अनिता पाटील डॉ किशोर महाजन डॉ गुलाबराव पाटील डॉ दिगंबर पाटील डॉ दत्तप्रसाद दलाल डॉ चेतन कोळंबे डॉ तुषार पाटील डॉ संगीता महाजन डॉ दिलीप हटकर डॉ योगेश महाजन डॉ तुषार नेहेते डॉ ताराचंद सावळे डॉ स्नेहल पाटील डॉ निलेश पाटील डॉ प्रफुल पाटील डॉ पंकज तळेले डॉ सचिन पाटील डॉ राजेश चौधरी डॉ अभिजीत सरोदे डॉ संकेत भंगाळे यांच्यासह आय एम ए चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील