श्रीकृष्ण गौसेवा समिति रावेर ची सेवपूर्तिची 21 वर्ष पूर्ण*
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर शहरात 2002 मधे संत श्रु श्री अलकाश्रीजी यांचा सत्संग झाला होता त्यामध्ये माताजींनी रावेर येथे गौशाळा व्हावी असा संकल्प घेण्यास सांगितले होते
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर शहरात 2002 मधे संत श्रु श्री अलकाश्रीजी यांचा सत्संग झाला होता त्यामध्ये माताजींनी रावेर येथे गौशाळा व्हावी असा संकल्प घेण्यास सांगितले होते त्याचीच प्रेरणा घेऊन सुमिरण रामायण मंडळ रावेर चे सदस्य श्री सुनील शेठ अग्रवाल यांच्या सोबत श्री सुधीर काका डहाळे चंद्रकांत चौधरी ऋषिकेश महाराज कपिल महाराज योगेश आस्वार विशाल अग्रवाल भास्कर बारी जगन महाजन व सर्व रामायण मंडळांनी एकत्र येऊन रावेर येथील दानदाते अनिल अग्रवाल ,संतोष अग्रवाल व सुनील अग्रवाल यांच्या जागा प्लॉट दान देण्याची विनती केली व त्यानी रामायण मंडळाच्या विनंतीला मान देऊन दोन प्लॉट गोशाळा बनण्यासाठी दान दिले व या ठिकाणी असलेली ओपन स्पेस ही दिली
श्रीकृष्ण गोशाळा या नावाने 2003 मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी चा मुहूर्त साधून सुरू करण्यात आली दोन-तीन गाईंपासून सुरुवात झालेली गोशाळा आज अनेक गाईंचे संगोपन करीत आहे एवढेच नव्हे तर या ठिकाणी आजारी व कुपोषित गाई आणून सोडण्यात येतात समितीमार्फत या गाईंची औषधोपचार करून व्यवस्थित निगा राखली जाते श्रीकृष्ण गौ शाळेमध्ये नित्य नियमाने चारा पाणी औषधी यांची सोय केली जाते तसेच साफसफाईवरही लक्ष दिले जाते या ठिकाणी गोमातेचे सेवेसाठी कर्मचारी वृंद सेवाभावी वृत्तीने काम करतात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गोमातेची गावातून मिरवणूक काढली जाते तसेच वर्षभरात येणारे सर्व सण गौशाळेची मंडळी श्रीकृष्ण गोशाळा पटांगणामध्ये साजरे करतात होळी रंगपंचमी महोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो तसेच वाढदिवस देखील गौसेवा करुन साजरे होतात यावर्षी श्रीकृष्ण गौसेवा समितीला 21 वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या उत्साहात यावल येथील डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते गोमाता पूजन करून व भुषण अग्रवाल यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली यावेळी प्रमुख व्यापारी अध्यक्ष श्री कन्हैयालाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी रावेर शिक्षण संवर्धन संघाचे चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल दान दाते संतोषजी अग्रवाल माजी नगरसेवक सुधाकर महाजन रावेर येथील अनेक व्यापारी परिसरातील महिला व बालगोपाल उपस्थित होते यावेळी ऋषिकेश महाराज यानी मार्गदर्शन केले समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले कपिल महाराज यांनी सूत्रसंचालन केले आभार सचिव चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल पाटिल ,भूषण कासार ,राहुल चौधरी, भास्कर बारी ,राजेश अग्रवाल ,किशोर पाटिल ,यानी केले.