रावेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ०३ नराधमांना ०३ तासात घेतले ताब्यात
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या परिचित तीन मुलांनी ओळखीचं फायदा घेऊन तिला फुस लावून घेऊन गेले व तिचे इच्छे विरुद्ध तीचेवर आळीपाळीने शारीरिक अत्याचार व तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सावदा पो स्टे ला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या ओळखीच्या तीन मुलांनी ओळखीचं फायदा घेऊन तिला फुस लावून घेऊन गेले व तिचे इच्छे विरुद्ध तीचेवर आळीपाळीने शारीरिक अत्याचार व तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सावदा पो स्टे ला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. व आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली
सावदा परिसरात घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी तसेच अपर पोलीस अधीक्षक नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोस्टे चे सपोनि विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे व पोलीस स्टेशन कडील पथक यांनी गतीमान हालचाल करून ३ तासाच्या आत २ संशियीत आरोपी व १ विधी संघर्षित बालक याना ताब्यात घेतले. त्यांचेकडे प्राथमिक तपास करून विधिसंघर्षित बालकास मा. बालन्यायालय जळगाव व ईतर दोघांना मा.सत्र न्यायालया भुसावळ हजर दि.३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून,पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.सदरील संशयितांविरुद्ध सी.आर.नं.१७३/२०२४ व भारतीय न्याय संहितेचे कलम ७०(२),७५(१)(आय),३,(५) सह बाल लैंगिक संरक्षण कायदा सन २०१२ चे कलम ४,८,१२ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस तपास करीत आहेत