शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी माता जिजाऊ पुतळ्याजवळ शेतकरी संघर्ष समिती एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l मालवण येथील राजे छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी रावेर तालुका शेतकरी संघर्ष समिती चे वतीने दि.३/९/२०२४ रोजी जिजाऊ माता पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन मा. तहसीलदार रावेर व मा.पोलिस निरीक्षक सो रावेर यांना देण्यात आले आहे

Sep 2, 2024 - 16:09
Sep 2, 2024 - 16:12
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क  रावेर l

   

मालवण येथील राजे छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी रावेर तालुका शेतकरी संघर्ष समिती चे वतीने दि.३/९/२०२४ रोजी जिजाऊ माता पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन मा. तहसीलदार रावेर व मा.पोलिस निरीक्षक सो रावेर यांना देण्यात आले आहे 

       निवेदनात असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेले गड किल्ले उन,वारा,पावसात शेकडो वर्षांपासून दिमाखात उभे आहेत मात्र महाराष्ट्र शासनाने बांधलेला राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठच महिन्यात जमीनदोस्त झाला. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचली असुन, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. छञपती शिवाजी महाराजांचा नावाने मताचे राजकारण करणाऱ्या ढोंगी शिवप्रेमी असलेल्या शिवद्रोही सरकारने भ्रष्टाचार केल्यानेच हा पुतळा पडला असल्याने या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. व नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्र चे निष्क्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दि.३/९/२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेपासून जिजाऊ नगर, जुना सावदा रोड येथील जिजाऊ माता पुतळ्या जवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून रावेर यावल तालुक्यातील समस्त शिवप्रेमी जनतेने या निषेध आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघर्ष समिती चे सुरेश चिंधु पाटील, आर.के.चौधरी,ॲड जे जी पाटील, प्रदिप सपकाळे, दिलीप साबळे, दिनेश सैमिरे यांनी केले आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील