विवरे येथे उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर( प्रतिनिधी अनिल मानकरे ) विवरे येथे उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा १९ फ़्रेब्रवारी २० २५ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Feb 21, 2025 - 10:32
 0
विवरे येथे उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा  मोठ्या थाटामाटात साजरा

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

विवरे ता रावेर दि १९ फेब्रवारी २० २५ महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रावेर तालुक्यातील विवरे गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

ग्रामपचयत कार्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार येथे श्री छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन रावेर यावल तालुक्याचे आमदार अमोल जावळे याच्या हस्ते करण्यात आले

या ठिकाणी आकर्षक रांगोळी काढून देखणी सजावट करून परिसर स्वच्छ करण्यात आला. रावेर तालुक्यातील विवरे गावात शिवजयंती उत्सवाच्य निमित्ताने गावातील नागारिकानी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर केला उपस्थित ग्रामस्थ।नि महाराजाच्या प्रतिमेला अभिवंदन करून महाराजांचे विचार आणि संस्कार आत्मसात करण्याचा संकल्प केला. .

 श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत गावामधून मिरणूवक काढण्यात आली लोंखडे वाडा. शनिदेव वाडा ग्राम पंचायत परिसर भरवाडा महादेव वाडा आणि श्री छत्रपती  शिवाजी महाद्वार येथे शिव जयंती सांगता करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाला विवरे गावाच्या सरपंच सौ स्वरा पाटील सदस्य सुभाष पाटील सुनिल पाटील संदीप पाटील विकास पाटील वासुदेव नरवाडे मिठाराम चौधरी ह,भ,प, पाडूरंग महाराज पढरपूर कर नाना साळुखे मंगेश पाटील पंकज सावंत शिवराम महाजन, महेश सावंत व गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील