विजेचा शॉक लागल्याने मोरगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
विजेचा शॉक लागल्याने मोरगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
रावेर तालुक्यातील मोरगाव येथील शेतकर्याचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली या बाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
रावेर तालुक्यातील मोरगाव येथील भगवान मरू महाजन (वय ६० ) हे रविवारी सकाळी शेतात गेले होते . रात्री उशीरा पर्यन्त त्यांची शोधाशोध केली मात्र ते मिळून न आल्यामुळे रावेर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती .
सोमवार सकाळी मोरगाव शिवारातील कपाशीच्या शेतात ते मयत स्थितीत आढळून आले . रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी शवविच्छेदन केले .
याबाबत राजेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . भगवान महाजन यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक तुषार पाटील यांनी दिली .