वाघोड फाट्यावर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तरुणाचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू

मुक्ताई न्यू नेटवर्क रावेर. I वाघोड फाट्यावर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तरुणाचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे व त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे

Jul 12, 2025 - 17:36
 0
वाघोड फाट्यावर अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तरुणाचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर ।

रावेर तालुक्यातील वाघोड फाट्यावर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकलस्वार पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मनीष मनोहर सोलंकी (वय २४, रा. दुगवाडा, ता. जी. खंडवा) असे मृत युवकाचे नाव असून, तो सावदा येथे कामासाठी जात असताना हा अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवार रोजी सायंकाळी मनीष सोलंकी आपल्या दुचाकीने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरून सावदा दिशेने जात होता. वाघोड फाट्यावर  अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवरून त्याची गाडी असंतुलित झाली आणि तो रस्त्यावर आदळून पडला. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही गथेरोधक च्या कोणत्याही सूचना फलक, रिफ्लेक्टर अथवा स्पीड ब्रेकरचे स्पष्ट चिन्ह नव्हते, यामुळेच अपघात झाल्याचे दिसून येत आहे यामुळे येथे एका होतकरू तरणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे

या घटनेची रावेर पोलिसांना माहिती मिळतात रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत. युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रमुख मार्गावर असलेल्या स्पीड बेकार संबंधित कोणतीही माहिती दर्शविली नसल्यामुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत असून हा अपघात केवळ वेगमर्यादा किंवा निष्काळजीपणामुळे नाही, तर अपुऱ्या आणि गैरव्यवस्थित रस्त्यांच्या व्यवस्थेमुळे घडल्याचे नागरिक सांगत आहेत. अपुऱ्या प्रकाशयोजना, अयोग्य स्पीड ब्रेकर आणि यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी अशा दुर्घटना घडत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील