डंपर व मोटरसायकलच्या अपघातात तरुण जागीच ठार तर मित्र गंभीर जखमी नशिराबाद पुलाजवळील घटना

Muktai न्यूज नेटवर्क रावेर l डंपर व मोटरसायकलच्या अपघातात तरुण जागीच ठार झाला व मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद पुलाजवळ घडली

Jul 19, 2025 - 15:09
Jul 19, 2025 - 15:17
 0
डंपर व मोटरसायकलच्या अपघातात तरुण जागीच ठार तर मित्र गंभीर जखमी नशिराबाद  पुलाजवळील घटना

Muktai न्यूज network Raver I 

बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध मारुती मंदिराचे दर्शनघेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातून भाविक येत असतात त्याचप्रमाणे मित्रांसह निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी ६ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलाजवळ घडली.

या अपघातातील मृत तरुण हर्षल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता. धरणगाव) असे आहे. हर्षल पाटील हा वराड येथे आई-वडील व बहिणीसोबत राहत होता.

शनिवारी १९ रोजी पहाटे तो गावातील ८ ते १० मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाला होता. दर्शना आधीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव भुसावळ रोडवरील नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हर्षल हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने घटनेनंतर घरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील