राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोचुरच्या राणी परदेशी हिने पटकावले सुवर्णपदक
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोचूरच्या राणी परदेशी हिने पटकावले सुवर्णपदक
कोचुर तालुका रावेर येथील राणी परदेशी हिने रायपूर छत्तीसगड येथे रविवार 14 जानेवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत ४४किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
रायपूर छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वेस्ट झोन पावर लिफ्टिंग स्पर्धेत श्रीस्वामीनारायण स्पोर्ट क्लब सावदा ची खेळाडू राणी सुदाम परदेशी हिने ४४ किलो वजनी गटात एकूण १४७.५ किलो वजन उचलून सब ज्युनिअर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा बहुमान प्राप्त केला.
राणी परदेशी ही कोचूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून या खेळाडूचे तिच्या या यशाबद्दल सर्व गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या खेळाडूला श्री स्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक पंकज महाजन यांचे मार्गदर्शन लाभले