रावेर लोकसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून नाव जवळपास निश्चित, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होण्याची शक्यता?

रावेर लोकसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून नाव जवळपास निश्चित, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घोषणा होण्याची शक्यता?

Apr 9, 2024 - 12:39
 0
रावेर लोकसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून नाव जवळपास निश्चित, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  घोषणा होण्याची शक्यता?

मुक्ताई न्यूज

 नेटवर्क रावेर

रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे हि जागा आल्याने या जागेवर तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवारांची पक्षातर्फे महिनाभरापासून चाचपणी करण्यात येत आहे.दि.8 सोमवार रोजी पुणे येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू आहे. यावेळी पक्ष श्रेष्ठींनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केल्या. उद्योजक श्रीराम पाटील यांना या पक्षातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या नावाची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जवळपास निश्चित झाल्याचे खात्री लायक वृत्त आहे.

पुणे येथे दुपारपासून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, जितेंद्र आव्हाड, माजी कृषी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत सर्व इच्छूक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेतून उमेदवारी कोणाला द्यायची हे सस्पेन्स ठेवण्यात आले आहे. मात्र तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवाराचे नाव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावेरच्या जागेबाबतचा सस्पेन्स संपणार आहे. 

 राज्यातील रावेर मतदार संघाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून अनेक इच्छुकांची नावे कालांतराने मागे पडत गेली. एड रवींद्र पाटील व उद्योजक श्रीराम पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याचे दिसत होते. मात्र एड रवींद्र पाटील यांच्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार म्हणून उद्योजक पाटील यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी शरद पवार गटातर्फे श्रीराम पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे श्री पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून मंगळवार रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करण्याची अधिक शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील