रावेर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधीसूचना जारी
रावेर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधीसूचना जारी
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या सर्व गावांमधील राजकीय वातावरण तापणार असून प्रत्येक ठिकाणी जोरदार रंगतदार निवडणूक लढाई पाहायला मिळणार
रावेर तालुक्यातील 13 ग्राम पंचायतीची सार्वत्रीक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे.येत्या 16 ऑक्टोबर पासुन उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असुन.जनतेतुन थेट सरपंचपदाची निवडणुक होणार असल्याने बहुतांश ग्राम पंचायतांच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या होतील यात शंका नाही.उटखेडा,चिनावल,पातोंडी,,ग्राम पंचायती सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
निवडणुक आयोगा कडून राज्यभरात ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.यामध्ये रावेर तालुक्यातील 13 ग्राम पंचायती आहे.
यात शिंगाडी-भामलवाडी,खिर्डी बु,पातोंडी-बोहर्डे, थेरोळा, विटवे-सांगवे ग्रुप, आभोडा बु,वाघोदा खुर्द, मांगी-चुनवाडे, चिनावल, रोझोदा, उटखेडा, कळमोदा व आंदलवाड़ी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या 13 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे.यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे दि 16 ऑक्टोबर ते दि 20 ऑक्टोबर , माघार घेण्याची मुदत दि 25 ऑक्टोबर मतदान दि 5 नोव्हेबर रोजी होणार असून निकाल दि 6 नोव्हेबर जाहीर होणार आहेत. यामुळे या सर्व गावांमधील राजकीय वातावरण तापणार असल्याचे बोलले जात आहे