रावेर तालुका अखिल भारतीय जीवा सेने तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर रावेर तालुका अखिल भारतीय जीवा सेने तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट रोजी रावेर येथे मंगलम लॉन्स संपन्न झाला
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुका अखिल भारतीय जीवा सेने तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट रोजी रावेर येथे मंगलम लॉन्स संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रसंगी अध्यक्ष म्हणून राजकुमार गाजरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय जीवासेना हे होते कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींमध्ये प्रवक्ता अखिल भारतीय जीवासेना सुरेश जी बोर्ड सेना युवाप्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय जिवासेना देवदास भाऊ फुलपगारे अखिल भारतीय जीवा सेना युवा प्रदेश सचिव डॉ नरेंद्र महाले,डॉ मनोज माने, भाजपा जिल्हाध्यक्ष बऱ्हाणपूर, जिल्हाध्यक्षा कोकिळाताई चित्ते समन्वय समिती प्रमुख सुरेश ठाकरे प्राध्यापिका सौ योगिनी ताई महेंद्र सेठी डॉ किशोर अमोदकर, जिल्हाध्यक्ष गणेश सेठी वाघोदा येथील दाते लिलाधर महाजन यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्यस्तरीय नाभिक हिरकणी पुरस्कार हा समाजकार्याबद्दल सौ प्रा योगिनी महेंद्र सेठी यांना देण्यात आला. त्याचबरोबर शिवरत्न वीर जिवाजी महाले हा राज्यस्तरीय पुरस्कार डॉ किशोर अमोदकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या जवळ जवळ 135 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाच्याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये शिक्षण आणि समाजकार्य या विषयी मार्गदर्शन केले. तसेच, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज बोरनारे सर व सौ काजल तुषार मानकरेयांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सेठी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार योगेश आमोदकर व योगेश बोरनारे यांनी केले. कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी गुण गुणगौरव समिती अध्यक्ष योगेश आमोदकर उपाध्यक्ष आबा चौधरी सचिव धनराज बोरनारे सर सहसचिव रवींद्र जी सापकर गुणगौरव समिती सरचिटणीस राजेश भाऊ सावळे जितू शिरणामे सुरेंद्र शिवरामे उमेश निंबाळकर विकास आमोदकर पिंटू सापकर योगेश बोरनारे निंभोरा राजेश बोरनारे कृष्णा मावळे मोनज टोगे ललित मनाकरे राहुल वरणकर तुषार जलंकार किरणं वरणकर मनोहर चौधरी रामेश्वर टोंगळे राहुल बोरसे किरणं बोरसे संजय बोरसे गोकुळ मावळे युवराज सापकर सतीश महाजन जयेश बोरनारे हर्षल बोरनारे आकाश मावळे मानव बोरनारे उत्कर्ष सेठी सोहम बोरनारे सुनील बानाईत समाधान साळुंके विनोद बोरनारे नयन शिवरामे प्रभाकर मानकरे सुभाष मानकरे आकाश बोरनारे रोहन निंबाळकर यशवंत साळुंके अशोक साळुंके लक्ष्मीकांत बोरणारे अजय कळमकर पुंडलिक गालफाडे प्रकाश जी सेठी मयूर शिरनामे सुनील शिवरामे महिला अध्यक्ष ज्योतीताई सापकर उपाध्यक्ष कविताताई चौधरी यांच्या सह संपूर्ण अखिल भारतीय जीवा से सेनेचे शिलेदार व संपूर्ण नाभिक समाज यांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले