रावेरच्या सोनाली चौधरी चे पुणे येथील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर रावेरच्या सोनाली चौधरी या विद्यार्थिनीने पुणे येथील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवीत घवघवीत यश संपादन केले याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

Jul 20, 2025 - 13:53
 0
रावेरच्या सोनाली चौधरी चे पुणे येथील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक
रावेरच्या सोनाली चौधरी चे पुणे येथील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l

   क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तसेच महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशन च्या मान्यतेने महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरची खेळाडू कु. सोनाली राजेंद्र चौधरी हिने रौप्यपदक पटकावले आहे.

पुणे येथील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री. छत्रपती क्रीडा संकुल बॉक्सिंग हॉल मध्ये राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात 19 वर्ष वय व 55 किलो वजन गटात रावेर शहरातील कु. सोनाली राजेंद्र चौधरी हिने 141 किलो वजन उचलून खेळाडू 2024-25 यावर्षीचे राज्यस्तरीय रौप्य पदक पटकावले.

सोनाली हि रावेर शहरातील सावदा रोड वरील रहिवासी माजी सैनिक व सध्या रावेर स्टेट बँकेचे सुरक्षा रक्षक तसेच श्री. रोकडा हनुमान व्यायाम शाळेचे सदस्य राजेंद्र रामदास चौधरी यांची मुलगी असून यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रावेर ची विद्यार्थिनी आहे. 

तिच्या या कामगिरी मुळे रावेरचे नाव राज्यात झळकले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील