ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

Nov 2, 2023 - 10:32
 0
ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

मुक्ताई वार्ता रावेर

 न्यूज नेटवर्क

सोमवार रोजी अल्प बचत भवन जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई , शाखा जळगाव तर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्रस्तरिय पञकारांसाठी भव्य कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळ्यात ऐनपुर ता.रावेर येथील सरपंच अमोल महाजन यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्मृति चिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद साहेब, फैजपुर येथील सतपंथ मंदिराचे गादिपती महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरिजी महाराज, पत्रकार अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  यदु जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यध्यक्ष  वसंतराव मुंडे, मंञालय व विधीमंडळ पञकार संघ अध्यक्ष .प्रमोद डोईफोडे,अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, दिपक सपकाळे व पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष शरद कुलकर्णी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले.कैलास लवंगळे, योगेश सैतवाल, रावेर ता.अध्यक्ष प्रमोद कोंडे, उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, विजय एस अवसरमल, इक्बाल पिंजारी, विजय के अवसरमल, ऐनपुर येथील मा.ग्रामपंचायत सदस्य विलास अवसरमल,रुपेश इंगळे यासह आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते. अमोल महाजन यांनी ऐनपुर गावांत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याने त्यांच्या कार्याची नोंद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरपंच अमोल महाजन यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन मान्यवरांनी या प्रसंगी केले. ऐनपुर परिसरातुन अमोल महाजन यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .या प्रसंगी ऐनपुर येथील पञकार मंडळी उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील