मुक्ताईनगर येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना प्रशिक्षण
मुक्ताईनगर येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना प्रशिक्षण
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर प्रतिनिधी , कैलास कोळी
9फेब्रुवारी रोजी,महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुक्ताईनगर प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाती FCल महिला व मुलींना दिनांक 9/02/2024 रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आला. त्यात सर्वप्रथम किशोरवयी मुलींनी सुरुवात स्वागत गीताने करून सर्व वातावरण आनंदमय केले. विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कल्पना तायडे पर्यवेक्षिका यांनी केले. या वेळी स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह,या विषयावर किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले.
डॉ. अमित कुमार घडेकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रुईखेडा, यांनी आहार,आरोग्य व लसीकरण,किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींमध्ये होणारा ॲनिमिया, या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
श्री प्रशांत तायडे महिला संरक्षण अधिकारी यांनी बाल संगोपन, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक अत्याचार अधिनियम, गुड टच बॅड टच, इत्यादीं विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच सौ सुनीता पाटील पर्यवेक्षिका यांनी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव, या विषयावर मार्गदर्शन केले. श्रीमती सरिता दडमल पर्यवेक्षिका यांनी लेक लाडकी योजना, बी.एम.आय व वजन उंची बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण देण्यात आले, तसेच सौ दिपाली बोराखडे यांनी मुलींमध्ये उद्योजकता निर्माण व्हावे म्हणून केक बनवण्याचे प्रशिक्षण दिले.कार्यक्रमास बहुसंख्य किशोरवयीनमुली महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, महिला संरक्षण अधिकारी,उपस्थित होते.