मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, समाजमन सुन्न करणारी घटना

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, समाजमन सुन्न करणारी घटना घडल्याने सर्वात हळहळ व्यक्त होत आहे

Feb 2, 2025 - 16:29
 0
मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, समाजमन सुन्न करणारी घटना

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर  l 

मुक्ताईनगर तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा दुर्दैव मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे. यात कर्की येथील कृषी केंद्र संचालक किशोर दयाराम पाटील कर्की  आणि अरुण  धनु पाटील बेलखेड  यांचा दोघांचा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजमन सुन्न झालेले आहे 

  मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली-कर्की परिसरातील दोघांचा वेगवेगळ्या मोटार सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला,समाजमान सुन्न झाले अरुण पाटील यांनी आपल्या परिसरातील मनमिळाऊ,शांत,व्यक्तिमत्व आणि कष्टाळू शेतकरी असा ठसा उमटविला होता तर किशोर पाटील यांनी कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना सेवा देत होते आणि कमी वेळेत,कमी वयात त्यांनी कष्टाने व्यवसायावर पकड बसविली होती त्यामुळे आपल्या स्वकतृत्वाने मोठी झालेली ही दोन्ही माणसं अपघातात दुर्दैवाने निघून गेल्याने अतिशय वेदणादायी आहे.

 दोघांवर अत्यंत दुःखद वातावरणात अत्यंत संस्कार करण्यात आले.

???????? मुक्ताई वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ????????

दोन्ही परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे त्यातून दोन्ही परिवाराना सावरण्याची परमेश्वर शक्ती देवॊ ही प्रभू चरणी प्रार्थना..... भावपूर्ण श्रद्धांजली????????

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील