मुक्ताईनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा नागरिकांना श्रीराम पाटील यांचे प्रचार रॅली दरम्यान आश्वासन

मुक्ताईनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा नागरिकांना श्रीराम पाटील यांचे प्रचार रॅली दरम्यान आश्वासन

May 8, 2024 - 10:25
May 8, 2024 - 13:10
 0
मुक्ताईनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा नागरिकांना श्रीराम पाटील यांचे प्रचार रॅली दरम्यान आश्वासन

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मुक्ताईनगर

 महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलींची सुरुवात प्रवर्तन चौकातील महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. प्रवर्तन चौकातून नागेश्वर मंदिर, चाळीस मोहल्ला, अल्फा हायस्कुल, शिवराय नगर, अहिल्यादेवी नगर, संताजी नगर, मार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून हि रॅली महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयाजवळ आल्यावर समारोप झाला.

प्रचारफेरीला कार्यकर्त्यांसह मतदारांनीही भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी तो सोडवण्यासाठी काहीही हालचाली न केल्याचे मतदारांनी सांगितले. त्यावेळी उमेदवार श्रीराम पाटील यांनी भावी काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मतदारांना दिले. याबाबत विशेषतः स्त्री मतदारांनी आनंद व्यक्त केला. मतदारांनी श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन दिले..

प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणी खडसे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, रावेर पं.स.माजी सदस्य दीपक पाटील, ईश्वर रहाणे, पवनराजे पाटील, संतोष पाटील, संतोष बोदडे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व मुक्ताईनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारफेरीला कार्यकर्त्यांसह मतदारांनीही भरभरून प्रतिसाद देत बहुसंख्या मताधिक्याने श्रीराम पाटील यांना

निवडून आणण्याचा निर्धारही केला.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील