शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महिलांच्या सन्मानासाठी तरुणांच्या रोजगारासाठी झटणार असल्याचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची ग्वाही
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महिलांच्या सन्मानासाठी तरुणांच्या रोजगारासाठी झटणार असल्याचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची ग्वाही
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेत रसलपुर,रमजीपुर, बक्षीपुर, खिरोदा, गुलाबवाडी यासह आदिवासी भागातील गावातील नागरिकांच्या भेटी घेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महिलांच्या सन्मानासाठी तर तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली
रसलपूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत गावातून नागरिकांचे प्रचारादरम्यान संवाद साधला यावेळी अभू तपूर्व असा प्रतिसाद या प्रचार रॅलीला दिसून आला. ढोल ताशाच्या गजरात मतदारांना आपल्या विकासाचे व्हिजन सांगत आपल्याला बहुसंख्या मतांनी निवडून द्यावे या त्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सदैव झटणार असल्याचे यावेळी धनंजय चौधरी यांनी सांगितले
यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धनंजय चौधरी यांनी काय म्हटले ते पाहूया