मालकाने विम्याच्या पैशासाठी स्वतः रचला चोरीचा डाव,मालकासह तिघे ताब्यात

मालकाने विम्याच्या पैशासाठी स्वतः रचला चोरीचा डाव,मालकासह तिघे ताब्यात

Apr 8, 2024 - 22:44
 0
मालकाने विम्याच्या पैशासाठी स्वतः रचला चोरीचा डाव,मालकासह तिघे ताब्यात

फॅक्टरीतील मशनरी यांचा काढलेल्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी निंबोल येथील एका इसमाने चोरीचा डाव रचुन रावेर पोलिस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली होती. या गुन्हा संदर्भात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फिर्याद दिलेल्या आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीस गेलेल्या ४ लाख चाळीस हजारराचे व्हेपर्स मशनरी जप्त केल्या आहे.यामुळे पोलिस प्रशासनाचे नागरीकां मधुन कौतुक होत आह

रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनिल पाटील यांचे नांदुरखेडा शिवरात श्रीकृष्ण केला व्हेपर्स ही फॅक्टरी आहे.दि ३ रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतुन विविध मशनरी चोरीस गेल्या होत्या.रावेर पोलिसांनी या गुन्हा संदर्भात तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली.यावेळी पोलिसांनी आरोपी निरज पाटील (वय 24 वर्षे) रा निंबोल,उमेश सुतार (वय 24 वर्षे) कौशल जंजाळकर, (वय 19 वर्षे ) दोघे रा. मेहतर कॉलनी रावेर येथून ताब्यात घेत त्यांची विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे.या बाबत तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई

जळगाव पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, फैजपूर सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह रावेर पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोकॉ सचिन घुगे पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पाटील,पोकॉ महेश मोगरे,पोकॉ राहुल परदेशी यांनी गुन्हाचा तपास करून आरोपी ताब्यात घेतले आहे. दरम्यान चोरीचा बनाव करणा-या तिघ आरोपीं कडून ४५ हजार रुपये किमतीची बनाना वेफर्स मशीन, ४५ हजार रुपये किमतीची पोटॅटो वेफर्स मशीन, ३५ हजार रुपये किमतीचा पोटॅटो पीलर मशीन, ४८ हजार रुपये किमतीचा ड्रायर मशीन, १५ हजार रुपये किमतीचा पॅकींग मशीन, १७ हजार रुपये किमतीचा एक ब्लोवर मशीन, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा कोटिंग पॅन मशीन, ९० हजार रुपये किमतीच्या पॅकींग मशीन असा एकूण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील