अनैतिक संबंधातून शेतातून घरी परतणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून,मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा येथील घटना मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

Apr 6, 2024 - 17:10
 0
अनैतिक संबंधातून शेतातून घरी परतणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून,मुक्ताईनगर तालुक्यातील  महालखेडा येथील घटना मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

मुक्ताई वार्ता

 न्यूज नेटवर्क रावेर

मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा शिवारात 37 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर, गळ्यावर धारदार हत्याराने वार करीत तिची निघृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली होती.महालखेडा येथील मालताबाई मनोज खाडे (वय 37) असे मयत महिलेचे नाव आहे. ती सकाळी शेतातील कामे करण्यासाठी गेली होती.

शुक्रवार, दि. ५ एप्रिल रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान महालखेडा शिवारातील डाबर नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात महिलेची ओळख पटली. त्यानंतर मयत महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय सुधाकर पाटील (रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातीलच रहिवाशी संजय पाटीलचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत महिलेसोबत याच मुद्यावरून तो वाद सुध्दा करत असायचा. याच वादातून शुक्रवारी त्याने डोक्यात दगड टाकुन, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन संबंधित महिलेचा खून केला, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील