महाराष्ट्रातील नवदुर्गांनी या करंटे महायुती सरकारचा पायउतार करावा,ऍड.रोहिणी खडसे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l लाडकी बहीण योजने साठी महाराष्ट्र सरकारने इतर शासकीय निधी थांबवला आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
लाडकी बहीण योजने साठी महाराष्ट्र सरकारने इतर शासकीय निधी थांबवला आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत, एकीकडे महागाई भरमसाठ वाढवलेली आहे आणि एकीकडे पैसा लाडकी बहीण योजनेसाठी दिला जात आहे.
सध्या सणासुदीचे दिवस आहेत महागाईमुळे सर्व नागरिक महिला त्रस्त आहेत महाराष्ट्रातील नवदुर्गांनी एकत्र येऊन महायुतीच्या सरकारचा या निवडणुकीत पायउतार करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केले आहेत