पुणे दानापुर पुणे एक्सप्रेस ला रावेर येथे थांबा प्रवासी संघटनांच्या मागणीला अखेर यश

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l पुणे दानापुर पुणे एक्सप्रेस ट्रेन ला रावेर येथे थांबा मिळाल्याने प्रवासी संघटनेच्या मागणीला यश आले आहे यासाठी केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे नेहमीच प्रयत्नशील होत्या

Aug 13, 2025 - 22:03
 0
पुणे दानापुर पुणे एक्सप्रेस ला रावेर येथे थांबा प्रवासी संघटनांच्या मागणीला अखेर यश

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर ।

 रावेर रेल्वे स्थानकावर पुणे-दानापूर  पुणे एक्सप्रेसला अखेर थांबा मिळाल्याची एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे रावेर तालुक्यातील प्रवाशांमध्ये, विशेषतः पुण्याकडे शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध प्रवासी संघटना या थांब्याच्या मागणीसाठी संघर्ष करत होत्या अखेर त्यांच्या या संघर्षाला यश मिळाले

रावेर स्टेशनवर सकाळी अप/डाउन गाड्या नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. तसेच विशेषता करून पुण्याकडे शिक्षण घेणाऱ्या व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी व नागरिक यांना पुण्याकडे जाण्या येण्यासाठी रावेर इथून एक्सप्रेसला थांबा नसल्यामुळे अडचण निर्माण होत होती या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रवासी संघटनांनी रेल्वे विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली होती. वेळोवेळी आंदोलने ही केली होती यामध्ये प्रवासी संघटना अध्यक्ष संजय बुवा रजनीकांत बारी आणि दुसऱ्या प्रवासी संघटनेचे प्रशांत बोरकर यांचाही या स्थानकावर गाड्यांना थांबा मिळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सुरूच होता अखेर त्यांच्या या संघर्षाला यश मिळाले आहे

विविध प्रवासी संघटनांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची  रेल्वे विभागाने दखल घेत, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्तक्षेपामुळे पुणे-दानापूर एक्सप्रेसला रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळवून देण्यात आला आहे. हा निर्णय रावेर तालुक्यातील प्रवाशांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे.

पुणे दानापूर पुणे या या एक्सप्रेसला रावेर थांब्यामुळे प्रवाशांना प्रवासात मोठा फायदा होईल, असे स्थानिकांनी सांगितले. भविष्यातील रावेर तालुक्यातील अप/डाउन करणाऱ्या प्रवाशांकडून कटनी पॅसेंजरची डाऊन वेळ बदलण्याची, तसेच महानगरी, झेलम आणि सचखंड एक्सप्रेसलाही रावेरमध्ये थांबा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर आणि नांदुरा या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रावेर सह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मजूर केला आहे. त्यात पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तर अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 12149/12150 दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे,

१२६५६/१२६५५ नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे,

२२१७७/२२१७८ महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे,

११०५७/११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे,

१२११३/१२११४ गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे,

१२७१९/१२७२० जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे,

१२१२९/१२१३० आझाद हिंद आणि २०९२५/२०९२६ सूरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा मिळवण्याची मागणी पुढे येत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील