पाल वृदावन धाम आश्रमात पायी दिंडी सह हजारो साधकांचे आगमन ; आज सद्गुरु पादुका पूजन ,दीक्षा व सत्संग समारोह

पाल वृदावन धाम आश्रमात पायी दिंडी सह हजारो साधकांचे आगमन ; आज सद्गुरु पादुका पूजन ,दीक्षा व सत्संग समारोह

Jul 20, 2024 - 23:00
 0
पाल वृदावन धाम आश्रमात पायी दिंडी सह हजारो साधकांचे आगमन ; आज सद्गुरु पादुका पूजन ,दीक्षा व सत्संग समारोह

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर

पाल ता रावेर :- सातपुडयाच्या कुशीत आध्यात्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त पूज्य बापूजी च्या समाधि दर्शन व पादुका पूजन महोत्सवात देशभरातून हजारो चैतन्य साधक परिवाराचे पायी तसेच इतर साधनाद्वारे आगमन झालेले असून हरि नाम संकीर्तनाने पाल नगरी दुमदुमली आहे.तसेच दी २० रोजी सायंकाळी भजन संध्या,तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा,व श्रद्धावचन,विविध चैतन्य साधक परिवार समिति चे सत्कार समारंभ करण्यात आले.

  आज या पावन महोत्सवा प्रसंगी सकाळी श्री हरिधाम मंदिर स्थित समाधि स्थळी सद्गुरु पादुका पूजन,ध्यान, महाआरती,गुरु दीक्षा,व आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या अमृत वाणीतुन सत्संग अमृताचा लाभ मिळणार असून संत महतांचे आशीर्वचन भाविकाना प्राप्त होणार असून या महोत्सवात पोलिस प्रशासन,सह इतर यंत्रणा सज्ज झालेले दिसून येत आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील