परदेशानंतर आता रावेर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवा देणार बालरोगतज्ञ डॉ. साजिद खान

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक शब्बीर शेख व मान्यवरांनी केला बालरोग तज्ञ डॉक्टर साजिद खान यांचा सत्कार

Jan 16, 2025 - 19:50
Jan 16, 2025 - 19:55
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l

रावेर येथील मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये आता थेट परदेशातून आपल्या सेवेचा अनुभव घेऊन रावेरकरांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळणार आहे. रावेर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नुकतेच बालरोग तज्ञ डॉक्टर साजिद खान यांचे स्वागत हॉस्पिटल मधील कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बालरोग या विभागाचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन माजी नगराध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद व डॉक्टर शब्बीर शेख व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या विभागाचे उद्घाटन झाल्या झाल्याच अत्याअवस्थ असलेल्या बालकाला यावेळी डॉक्टर साजिद खान यांनी उपचार करून थोड्याच वेळात स्टेबल केले यामुळे नातेवाईकांच्या जीवात जीव आला. 

 रावेर मेट्रो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 17 ते 24 जानेवारी या दरम्यान लहान मुलांची मोफत तपासणी केली जाईल याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शब्बीर शेख यांनी केले आहे 

 यावेळी मोरगाव येथील आर वी पाटील यांनी डॉक्टर साजिद खान यांचा सत्कार केला याप्रसंगी हरीश शेठ गनवाणी, प्रल्हाद महाजन, शैलेंद्र अग्रवाल अरुण शिंदे मेहमूद शेख, युसूफ खान, असद मेंबर, रफिक शेख,नबीउद्दीन शेख, फिरोज खान वसीम मेंबर कालू सेट पपई वाले, निसार कुरेशी,आर आर महाजन, इब्राहिम कच्ची, आरिफ बारदान, सलीम भाई राष्ट्रवादी, कालू बर्फवाले, वाहब खाटीक, सुधाकर नाईक वार्ताहर शकील शेख, समशेर खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील