दिवाळीपूर्वी ५४००० शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे
दिवाळीपूर्वी ५४००० शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे*
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क
पुनर्रचित हवामानावर आधारित *“फळ पिक विमा योजना आंबिया बहार”* सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच येत्या ४-५ दिवसात थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार अशी माहिती *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दिली.
आपल्या पिका विमा उतरविलेल्या एकूण *७८०००* शेतकऱ्यांपैकी *५४०००* शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळणार असून, ११००० शेतकऱ्यांनी पिक नलावता विमा उतरविलेला असल्याचे तसेच १३००० शेतकऱ्यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचे पिक विमा कंपनीच्या सर्वेक्षणात आले असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. तसेच त्यांनी योग्य पद्धतीने विमा उतरविलेला असून, त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही, अश्या शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय येथे सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा अशी माहिती *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दिली.