तळपत्या उन्हात नांदुरा येथे श्रीराम पाटील यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी ,प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा आमदार एकडे यांचा निर्धार.
तळपत्या उन्हात नांदुरा येथे श्रीराम पाटील यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी ,प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा आमदार एकडे यांचा निर्धार.
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
नांदुरा/प्रतिनिधी
रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारासाठी नांदुरा शहरातून आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रचार रॅली निघाली. भर तळपत्या उन्हात मतदारांनी उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
येथील बस स्टॅन्ड जवळील पक्षाच्या प्रचार कार्यालयापासून रेल्वे स्थानकमार्गे शहराच्या प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी निघाली. एका ट्रॅक्टरमध्ये उमेदवार श्रीराम पाटील, आमदार राजेश एकडे, संतोष रायपुरे, डॉ अरविंद कोलते, नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार, संतोष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, अरुण अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमाकांत चौधरी, विनिता गायकवाड, गजानन ठोसर, दिलीप देशमुख, नरुशेठ नेहलानी, शाम राठी, प्रा खर्चे, राजूभाऊ वाडेकर, नरेश शेळके, सोपान सेलकर, अतावूर रहमान जमादार, ऍड साहेबराव मोरे यांच्यासह सुमारे दीड हजाराच्यावर कार्यकर्ते महिलांसह प्रचार फेरीत उपस्थित होते. दुपारी बारा ते दोन दरम्यान अत्यंत कडक उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साहात तसूभरही कमी झाला नाही. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी श्रीराम पाटील यांच्यावर आणि प्रचार फेरीवर पुष्पवृष्टी केली आणि फटाके फोडून त्यांचे स्वागतही करण्यात आले.
प्रचंड मताधिक्याने विजयी करणार : आमदार एकडे
भर उन्हात मतदारांनी रॅलीत सहभागी होत श्रीराम पाटील यांच्या विजयाचा निर्धार केला. आमदार राजेश एकडे यांनी यावेळी उमेदवार पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन मतदारांच्या साक्षीने दिले.