केळीला मातीमोल भाव मिळाल्याने, कर्ज कसे फेडू या विवंचनेतू नतरुण शेतकऱ्याची आत्महत्या
केळीला मातीमोल भाव मिळाल्याने, कर्ज कसे फेडू या विवंचनेतू नतरुण शेतकऱ्याची आत्महत्या
केळीला मातीमोल भाव मिळाल्याने, कर्ज कसे फेडू या विवंचनेतू नतरुण शेतकऱ्याची आत्महत्या
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
निंभोरा बुद्रुक, प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील तरुण शेतकरी हर्षल रविंद्र नेहेते (वय ३८) व्यवसाय शेती, रा. निंभोरा, ता. रावेर यांनी आपल्या शेतात केळीचे उत्पादन चांगले व्हावे व त्याचा मोबदला चांगला मिळावा या उद्देशाने आपले संपुर्ण शेती क्षेत्रात केळी पीकाची लागवड केली होती त्यासाठी त्याने मोठा खर्चही केला होता. केळी कापणी करुन ती विकली गेली असता लाखो रुपयांनी मिळणारे उत्पन्न घटल्याने व केळीला भाव न मिळाल्याने, लागलेला खर्चही न निघाल्याने निराश होऊन शेतकरी हर्षल नेहेते यांनी आर्थिक विवंचनेत आपण आता घेतलेले कर्ज कसे फेडावे व व्यवहार कसे करावे, पुढील काळात शेती कशी करावी व घर संसार कसा चालवावा या विवंचनेत होते अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
याच निराशेपोटी हर्षल नेहेते यांनी त्यांच्या शेतात दि.०६ मे सोमवार रोजी सकाळी ६.३० वाजेच्या आधी शेत गट नं. ११७७ मध्ये पेरुच्या झाडाला दोराच्या साहय्याने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली
हर्षल नेहेते यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच निंभोरा परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात हरीश युवराज नेहते यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यू र.जी नं.०७/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला स.पो.नी हरिदास बोचरे व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाव घेतली व पुढील तपास हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.का. अविनाश पाटील, प्रभाकर धसाळ तपास करीत आहे.
मयत हर्षल नेहेते हा मनमिळाऊ स्वभावाचा निर्व्यसनी तरुण होता त्यांचे पश्चात पत्नी, आई, बहिण व पाच वर्षीय मुलगी असा परीवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत फार मोठा जनसमुदाय होता. मयत हर्षल नेहेते हे विवेक नेहेते, धीरज नेहेते यांचे बंधू होते. तर पियूष नेहेते यांचे काका होते.