खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील पदी सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन चे सदस्य यांची निवड

खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील पदी सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन चे सदस्य यांची निवड

Aug 25, 2023 - 15:37
 0
खिर्डी बुद्रुक पोलीस पाटील पदी सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन चे सदस्य यांची निवड

रावेर (प्रतिनिधी )

     रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील सामाजिक संस्था तसेच परिसरात नावलौकिक असलेली एकमेव संस्था तत्पर फाउंडेशन या संस्थेने समाज हितासाठी व परिसरातील जनतेसाठी मग ते पूरग्रस्त असो का कोविड असो अशा परिस्थितीत या संस्थेने अग्रगण्य होऊन नेहमीच पुढाकार घेतला असून या संस्थेचे सभासद म्हणजेच परिसरातील सर्व पत्रकार असून या संस्थेने नेहमीच समाज हिताचे कार्य केलेले असून या संस्थेत असलेले सर्व सभासद हे नेहमीच जनकल्याणासाठी झटणारे असून आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो असे ध्येय व कर्तव्य समजून काम करणारे या संस्थेचे सर्व पदाधिकारी यामध्ये या तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील ,उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव प्रवीण धुंदले ,सदस्य प्रदीप महाराज ( पंजाबी ) शेख इद्रिस भाई, संकेत पाटील ,अंकित पाटील कांतीलाल गाढे,सतीश फेगडे, भिमराव कोचूरे , आणि रितेश महाराज उर्फ रितेश चौधरी या सर्व पदाधिकारी व सदस्य मंडळ यांनी उत्कृष्ट कार्य केलेले असून यांच्या कार्याबद्दल त्यांना व संस्थेला नेहमीच व बऱ्याच वेळा शासकीय व प्रशासकीय पुरस्कार सुद्धा मिळालेले असून याचाच वसा म्हणून या संस्थेचे संचालक सदस्य रितेश महाराज उर्फ रितेश चौधरी यांनी संस्थेच्या माध्यमातून व प्रत्येक पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाज हिताच्या कार्याची दखल व संस्थेने केलेल्या कार्याची पावती म्हणून खिर्डी बुद्रुक येथील पोलीस पाटील म्हणून त्यांची निवड झाली या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने व परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील